डोंबिवली ( शंकर जाधव ) : ३ मे हुतात्मा आन ठाकूर हुतात्मा मान ठाकूर बंधूंना जुनी डोंबिवली ग्रामस्थ,लाल बावटा रिक्षा स्टँड आणि रवींद्र कोमसकर ट्रस्ट तर्फे आपले जेवण माध्यमातून जेवण दान करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईत अनेक शिलेदारांनी इतिहासात पराक्रमाने आपली नावे कोरली अश्याच एक इतिहासात वसई ची लढाई मध्ये त्याचे खरे शिल्पकार आपले डोंबिवली कर तसेच जुनी डोंबिवली सुपुत्र हुतात्मा आन ठाकूर आणि मान ठाकूर ह्यांनी अमरण असा पराक्रम करून इतिहासात आपले पराक्रम कोरले. आज च्य दिवशी म्हणजेच ३ मे रोजी १७३९ मध्ये पहिले शाहू महाराज ह्यांच्या नेतृत्त्वात त्यांचे महाराजांचे शिलेदार चिमाजी अप्पा आणि पराक्रमी योद्धे आन ठाकूर आणि मान ठाकूर बंधू ह्यांनी आपले पराक्रम वसई किल्ला विजय इतिहासात कोरले गेले त्यांचे हे बलिदान आणि पराक्रमाची आठवण म्हणून दरवर्षी ३ मे रोजी विवध कार्यक्रम घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा देतात त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करिता त्या निमित्ताने जुनी डोंबिवली ग्रामस्थ,लाल बावटा रिक्षा युनियन आणि प्रमोद कोमासकार ट्रस्ट तर्फे आपले जेवण माध्यमातून जेवण वाटप कार्यक्रम घेऊन विनम्र अभिवादन करण्यात आली.
यावेळी आगरी नेते काळू कोमसकर, निर्भय बनोचे अध्यक्ष महेश निंबाळकर, कोम्रेड दिलीप वेलस्कर,समाजसेवक मधुकर माळी, समाजसेवक दयानंद म्हात्रे,समाजसेवक जगदीश ठाकूर ,समाज सेवक प्रशांत शिंदे,समाजसेवक राजू चव्हाण, नंदू जोशी, कॉम्रेड चिंचोलकर तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून आदरांजली दिली.