पोयरे येथील क्रिकेट स्पर्धेत सुतारवाडी संघ विजयी

 


देवगड / ( नारायण सावंत, ज्येष्ठ पत्रकार ) :  जी.बी स्टार क्रिकेट संघ पोयरे आयोजित मर्यादित षटकाचा ओव्हर आर्म क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धा नुकत्याच पर पडल्या. या स्पर्धेत १६ रसंघानी सहभाग घेतला होता.  त्यापैकी पोयरे सुतारवाडी व जी.बी स्टार या दोन संघामधे अंतिम लढत झाली.

क्रिकेट स्पर्धेत सुतारवाडी क्रिकेट संघ अंतिम विजयी ठरला तर जी.बी स्टार संघ उप विजयी ठरला. या सामन्यात तृतीय क्रमांक व आयुष स्पोर्टस आचरा चतुर्थ क्रमांक पोयरे गादवाडी उत्कृष्ट फलंदाज कुष्णा मेस्त्री व (सुतारवाडी) उत्कृष्ट गोलंदाज गुरुनाथ दुखंडे ( जी.बी स्टार) व मालीका वीर राजु मेस्त्री (सुतारवाडी) व उत्कृष्ट शेत्ररक्षंक गिरीश मेस्त्री(सुतारवाडी) या देण्यात आले जी.बी स्टार संघाचे संघनायक गुरुनाथ दुखंडे उपसंघनायक दाजी बागवे हे होते.

व सुतारवाडीचे संघनायक प्रसाद मेस्त्री उपसंघनायक राजु मेस्त्री हे होते.  प्रथम क्रमांकाचे पारितोषिक चार हजार (संदिप घाडी ) व चषक होते ते दिगंबर बागवे यांच्या स्मरणार्थ निलेश बागेवे यानी दिले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तीन हजार (जी.बी. स्टार संघ) व चषक ( सत्यावान दुखंडे व धोंडु राऊत) यांनी दिले.  तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दोन हजर चषक (आनंद बागवे) यांनी दिले. चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक एक हजार व चषक (गणपत सावंत यांच्या स्मरणार्थ प्रमोद सावंत) यांनी दिले

Post a Comment

Previous Post Next Post