घरीच अभ्यास करून स्वरा शाळेत पहिली

 


स्वरा भोस्तेकर हिला दहावीत ८८.६० टक्के गुण

अलिबाग ( धनंजय कवठेकर) : वडील परेलीसिसने अंथरुणाला खिळलेले, घरात कमावती आई अशा आर्थिक बेताची परिस्थिती असूनही कोणत्याही खासगी शिकवणीला न जाता आपल्या बुध्दीच्या जोरावर आणि शाळेत शिक्षकांच्या शिक्षणावर भर देऊन स्वरा संजय भोस्तेकर हिने दहावीत के. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल रेवदंडा या शाळेतून ८८.६० टक्के गुण मिळवून पहिला येण्याचा मान मिळविला आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च, २०२४ मध्ये इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी २७ मे रोजी मंडळातर्फे जाहीर करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा को ए सो. स रा तेंडुलकर शाळेची विद्यार्थिनी स्वरा संजय भोस्तेकर हिला दहावीत ८८.६० टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली आहे. तिच्या यशात आई, वडील, शिक्षक आणि स्वतः स्वराचा मोठा वाटा आहे. स्वरा हिला इंग्रजी ८६, मराठी ९०, हिंदी ९३, गणित ८६, सायन्स आणि टेक्नॉलॉजी ८६, सामाजिक शास्त्र ८८ असे एकूण ५०० पैकी ४४३ गुण पडले आहेत.

वडिल हे अंथरुणाला खिळले असून आई कामावर जात असल्याने स्वरा हिने याही परिस्थितीत खंबीरपणे आणि एकाग्रतेने अभ्यास करून आपले ध्येय गाठले आहे. वडिलांचे आजारपण काढत वेळेचे सदुपयोग करून स्वरा हिने यश संपादन केले आहे. तिच्या यशामुळे सर्व स्तरातून स्वराचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post