कुरुळ, (धनंजय कवठेकर) : सु. ए. सो माध्यमिक विद्यालय, कुरुळ माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के लागला आहे. शबा रिजवाना रजिउल्ला सिद्दीकी हिने ८४.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. अपूर्वा धनश्री माधव गोसावी हिला ७८.४० टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर प्रणय भारवी भरत कांबळे याने ७८.२० टक्के मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील , शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी मयशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व ज्यांना यश मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करावा असे आवाहन केले आहे. सर्व पालक, ग्रामस्थ, शाळेचे हितचिंतक यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.