Dombiwali blast : डोंबिवली स्फोटप्रकरणी अमुदान केमिकल्सच्या मालकाला अटक



ठाणे :  ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मानपाडा पोलीस ठाणे हद्‌दीतील एमआयडीसी हद्दीत में. अमुदान केमिकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये दि. २३ मे  रोजी १३:४० वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने त्यात आतापावेतो १३ व्यक्ती मयत झाल्या असून अजुन सुमारे ५५ लोक जखमी झाले आहेत.

सदर घटनेवरून  मानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी मलया प्रदीप मेहता (३८) याला गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपी मलया मेहता याची आई मालती मेहता यांना नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा तपास  गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही अअप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उप आयुक्त, गुन्हे  पराग मणेरे व  शिवराज पाटील यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १  निलेश सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्पेशल टास्क फोर्स शेखर बागडे, पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सपोनि सुनील तारमाळे, सपोनि गोरे, पोउपनि राठोड, पोहवा ठाकुर, पोहवा भोसले, पोना हिवरे, पोकों तानाजी पाटील यांनी कामगिरी पार पाडली.



Post a Comment

Previous Post Next Post