डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीजवळील सोनारपाडालगत असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी झालेल्या रिऍक्टरच्या स्फोटात ११ जणांचा मृत्यू तर सुमारे ६० जण जखमी झाले.या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल घेत पाहणी केली होती. या दुर्घटनेसंदर्भात अमुदान केमिकल कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहताविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमुदान केमिकल कंपनी मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
byMaharashtra WebNews
-
0