रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा आ. निरंजन डावखरेंना पाठिंबा



केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मानले आभार

ठाणे, : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला. याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे आमदार निरंजन डावखरे यांनी आभार मानले आहेत.


केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी निरंजन डावखरे यांची मंगळवारी भेट घेतली. तसेच त्यांना पाठिंब्याचे पत्र सोपविले. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, सरचिटणीस सुशिल महाडिक, उपाध्यक्ष सचिन बनसोडे, कोकण प्रदेशाध्यक्ष यशपाल ओहोळ, जिल्हाध्यक्ष धम्मदिप बनसोडे, प्रतिक सुताके, महेंद्र चंदनशिवे, धर्मराज ब्राम्हणे, अश्विन वाघ आदी उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळविण्याचा निर्धार विद्यार्थी संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.


Post a Comment

Previous Post Next Post