अँड राकेश पाटील यांचा जिल्हा प्रशासनाला सवाल
रायगड, ( धनंजय कवठेकर) : कोकणसह रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचे प्रमाण सर्वाधिक आहे,अशातच हजारो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या काही धरणांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे, यापैकी एक असलेले अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाची ओव्हरपलोची भित कोणत्याही क्षणी फुटून हाहाहाकार माजण्याची भीती वर्तवली जात आहे,असे घडल्यास उमटे धरण फुटीच्याआपत्तीला जबाबदार कोण?असा संतप्त सवाल अँड राकेश पाटील उमटे धरण संघर्ष समिती यांनी यांचा जिल्हा प्रशासनाला केला आहे,
अँड पाटील यांनी आज दिनांक १४ मे रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी रा.जि.परिषद,कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,तसेच रायगड जिल्हाधिकारी यांना उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने निवेदन दिले असून त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की,अलिबाग तालुक्यातील ४७ गावे व ३३ वाडया ह्या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबुन आहेत. सदरच्या उमटे धरणची निर्मीती ही १९७८ साली करण्यात आली असुन सदरचे धरण जीवन प्राधिकरणामधुन रायगड जिल्हा परिषदेस १९९५ साली हस्तांतरीत झाले आहे.
सदर उमटे धरणाच्या बांधकामानंतर धरणाच्या संरक्षण भिंतींची व बांधाची दुरूस्ती कधी आणि केंव्हा झाली याची माहिती स्थानिकांना नाही. तसेच धरणाच्या दुरूस्तीवर किती खर्च झाला आहे याचीही माहिती स्थानिकांना नाही.
उमटे धरणाची व धरणाचे संरक्षण करणाèया भिंतींची व बांधाची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. सन २०१७ ते २०१९ पासून आपल्या कार्यालयात धरणाच्या संरक्षण भिंतींच्या दुरावस्थेबाबत तक्रार अर्ज करूनही काेणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळयांत धरणाच्या ओव्हरफ्लाेची संरक्षण भिंतीच्या खालची माती खचून दगडांची भिंत शेवटची घटका माेजत असून सदरची संरक्षण भिंत या पावसाळ्यात वाहून गेल्यास माेठी हानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने धरणाचे आणि धरणाच्या संरक्षण भिंतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट ’ करणे आवश्यक आहे.
काेकणासह रायगड जिल्ह्यात आपत्तीच्या घटना घडलेल्या आहेत. त्या राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासन आपत्ती घडल्यावर उपाय याेजना करतात. त्यामुळे अशी आपत्ती घडण्याआधीच ४७ गावे व ३३ वाडया अंदाजे ३ लाखांच्यावर लाेक प्रभावित हाेण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे तातडीने उमटे धरणाची व धरणाच्या संरक्षण बांधांचे व भिंतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करून ओव्हरफ्लाेच्या भिंतीचे तात्काळ बांधकाम करून धरणाचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे.
उमटे धरण दुरुस्ती आणि गाळउपसा या प्रश्ना वर आम्ही वर्षानुवर्षे शासनकडे अर्ज विनंत्या करूनही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे, अशातच पावसाळ्यात काही मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत,
अँड,राकेश पाटील,
उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड,