दिवा, (आरती मुळीक परब): भारत- पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहण्यासाठी दिवा गावातील तरुण अमेरिकेत जाऊन पारंपरिक आगरी- कोळी वेष परिधान करून ते सामना पाहण्यासाठी मैदान उपस्थित राहिले होते. दिवा गावातील संदेश भगत, निलेश भोईर व मयूर भगत अशी या तरुणांची नावे असून यापूर्वी देखील विश्वचषकातील लंडन येथे झालेल्या भारत- पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहण्यासाठी हे तरुण गेले होते. आज अमेरिकेत होत असलेल्या मॅचसाठी पारंपरिक कोळी वेशभूषा व आई एकवीरा देवीचा फोटो घेऊन मैदानात गेल्यानंतर तिथल्या नागरिकांनी हातवर करून शुभेच्छा दिल्या.
लोकसभा निवडणुकीत आपल्या विजयाची हॅटट्रिक करणारे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बॅनर देखील या तरुणांनी त्यावेळी झळकवला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकप्रियता यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली असल्याचे बघायला मिळाले.