अलिबाग, (धनंजय कवठेकर) : गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्यावतीने मल्याण गावातील महिला व मुलींसाठी पाच दिवसीय मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अनुप गुप्ता - मुख्य महाप्रबंधक पीडीएचपीपी प्रोजेक्ट गेल उसर व जितिन सक्सेना - महाप्रबंधक, शितल लाकरा - मुख्य प्रबंधक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन गेल इंडिया लिमिटेड, उसरचे वरिष्ठ प्रबंधक तपस भारती यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य गिरीश विनायक पाटील, गेल इंडिया लिमिटेड उसरचे वरिष्ठ प्रबंधक अंकुर भाटिया, प्रबंधक विष्णू रामभाऊ गोरे, प्रबंधक रजत रोशन केरकेट्टा, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, प्रशिक्षिका प्रणाली तळेगावकर, आदिती मोरे तसेच रेश्मा पवार- सीआरपी मल्याण आदी मान्यवर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यावेळी तपस भारती यांनी उपस्थित महिला व मुलींना शुभेच्छा देत स्वसंरक्षणाचे महत्त्व सांगितले तर रजत केरकेट्टा यांनी देखील या प्रशिक्षणात संदर्भात माहिती दिली तसेच प्रिझम सामाजिक विकास संस्थेस शुभेच्छा दिल्या तर तपस्वी गोंधळी यांनी या पाच दिवसाच्या स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरामध्ये कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणास मल्याण गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.