मुंबई : महाराष्ट्र कॅडरच्या IAS अधिकाऱ्याच्या २७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास चंद्र रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची मुलगी लिपी (२७) हिने नरीमन पॉइंट येथील सरकारी निवासस्थानाच्या १०व्या मजल्यावरून पहाटे ४ वाजता उडी मारली. तिला तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
लिपी रस्तोगी हरयणातील सोनीपत येथे ती एलएलबीचे शिक्षण घेत होती आणि अभ्यासामुळे तिला नैराश्य आले होते. मुंबईत मंत्रालयासमोर सुनीती नावाची इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत लिपी रस्तोगीने आत्महत्या केली. ज्या इमारतीत लिपी आणि तिच्या आई वडिलांसह राहात होती तिथे आयएएस अधिकारी आणि काही मंत्र्यांची घरं आहेत. पहाटे तीनच्या सुमारास लिपीने उडी मारली, ज्यानंतर तिला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं पण तिचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मृत्यूवेळी तिने एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात तिने तिच्या मृत्यूबाबत कोणावरही आरोप केलेला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.