ग्रामीण स्तरावरूनच शिक्षणव्यवस्थेचे सक्षमीकरण होणे गरजेचे





दिलीप भोईर (छोटमशेठ ) यांचे मत

अलिबाग (धनंजय कवठेकर) : अंगणवाडीमधील मुलांवर  ग्रामीण स्तरावरूनच शिक्षणसंस्कार व्हायला हवेत. त्याकरिता शाळागृहे अद्ययावत असायला हवीत. आवश्यक त्या सर्वं सोयीसुविधा उपलब्ध करून देतांना वातावरण निरोगी आणि प्रसन्न राहील, ह्याकडेही लक्ष्य देणे आवश्यक आहे. शासनासोबतच समाजघटक म्हणून आपणही आपली जबाबदारी पार पाडायला हवी. असे मत दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ ह्यांनी देहेन येथे व्यक्त केले. श्रीगांव ग्रामपंचायतीमधील देहेन येथील नवीन अंगणवाडीचे उदघाटन करतांना ते बोलत होते.


रायगड जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ मधून साकारलेल्या ग्रामपंचायत श्रीगांव येथील देहेन विभागातील नवीन अंगणवाडीचे उद्घाटन दक्षिण रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष तथा माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ ह्यांच्या हस्ते  करण्यात आले. ह्यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर राणे, अलिबाग तालुका चिटणीस अमित पाटील, भाजप जिल्हा चिटणीस परशुराम म्हात्रे ,भाजप कार्यकर्ते राजेश पाटील, चेतन पाटील,  निलेश पाटील,  विक्रम पाटील, प्रहार संघटनेचे कोंकण प्रदेश प्रमुख सचिनभाऊ साळुंके व सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील , माजी सैनिक संतोष जुईकर , पेरकर मॅडम, विद्यार्थी  आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post