अलिबाग (धनंजय कवठेकर) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र आयोजित रायगड जिल्हा परिषद शाळा सायमन कॉलनी येथे योग दिवस साजरा करण्यात आला.
माणुसकी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांच्या संकल्पनेतून शाळेतील मुलांना आरोग्य चांगले मिळावे या उद्देशाने शाळेत योगाचा क्लास सुरू करून योग हे मुलांपासूनच शिकविले पाहिजे आणि हा योग दिवस रोज चालवा ह्या हेतूने याची सुरुवात प्रत्येक शाळांनी करावी. या प्रेरणेने माणुसकी आरोग्य विभाग सदस्य डॉ.राकेश सिंग यांनी आज शाळेतील मुलांना सूर्य नमस्कार व इतर योगासने करून दाखवत त्यांच्याकडून करवून घेतली, याचा आपल्या भविष्यात किती महत्व आहे याची जाणीव करून दिली. उत्तम आरोग्य कसे टिकवता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापिका पवार यांनी माणुसकी प्रतिष्ठानचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.