टोरंट पॉवर आपल्या दारी उपक्रमातून टोरंट मोबाईल व्हॅन ग्राहकांच्या दारी

 



दिवा, (आरती मुळीक परब) : दिवा- शीळ परिसरातील ग्राहकांच्या सोयीसाठी दिवा स्टेशन पूर्व जवळील चंद्रांगण इमारतीत टोरंटचे कार्यालय सुरू असून त्या ठिकाणी वीजबिल भरणा, तक्रार नोंदवणे ही कामे केली जातात. स्टेशनपासून लांब राहत असलेल्या ग्राहकांसाठी कंपनीतर्फे मोबाईल वीजबिल भरणा व्हॅन आता सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या घराजवळ मोबाईल व्हॅन येताच त्या ठिकाणी जाऊन वीज बिल भरणा करता येणार आहे.


बुधवार २६ जूनपासून दिवा परिसरात ही व्हॅन फिरणार आहे. सकाळी १० ते १२ वेळेत दिवा पूर्व येथील विकास म्हात्रे गेट, मातोश्री नगर येथे, ओंकार नगर (दुपारी १२.१५ ते १.३०), कमलाकर नगर (दुपारी २.३० ते ३), ग्लोबल स्कूलजवळ मैत्री पार्क (दुपारी ३.१५  ते ४.३०) या वेळेत ही मोबाईल व्हॅन फिरणार आहे. सदर व्हॅनमध्ये ग्राहकांना त्यांच्या वीज बिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 


दिवा स्टेशन येथे वीज बिल भरायला नागरिकांना घरापासून पायपीट करावी लागत होती. तसेच ते एकच वीजबिल भरणा केंद्र असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. ते लक्षात घेऊन टोरंटने ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांच्या घराजवळ फिरते वीज बिल भरणा केंद्र नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे टोरंट कंपनीतर्फे सांगण्यात आले. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून सदर व्हॅन नंतर नियमीत स्वरूपात ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध केली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post