५ तारखेपर्यत प्रश्न न सुटल्यास भाजपच्या शिष्टमंडळाचा आंदोलनाचा इशारा
एमआयडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : नियमितपणे पाणी बिल भरणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्रस्त नागरिकांनी भाजपाचे पदाधिकारी व माजी नगरसेवकांना माहिती दिली. नागरिकांची पाणी समस्या सोडविण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने डोंबिवली एमआयडीसी विभाग कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन शुक्रवारी उपोषणाचा इशारा दिला होता. शुक्रवारी २८ तारखेला भाजपच्या शिष्टमंडळाला एमआयडीसीचे अधिकारी आव्हाड यांनी निवेदन देत ४ तारखेपर्यत पाणी समस्या सोडवू असे आश्वासन दिले.
भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब,शिवाजी आव्हाड, माजी नगरसेवक जालिंदर पाटील,रमाकांत पाटील, मोरेश्वर भोईर यांनी दावडी, पिसवली आणि गोळवली भागातील पाणी समस्येवर एमआयएमडीसी अधिकाऱ्यांना जाब विचारला होता.पाणी समस्या दूर न झाल्यास नागरिकांना बरोबर घेऊन कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा दिला होता. यासंदर्भात डोंबिवली एमआयडीसीचे अधिकारी आव्हाड यांनी कार्यालयात शुक्रवारी भाजपच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली.
नंदू परब म्हणाले, ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यानंतर या भागात पाणी समस्या पुन्हा सुरु झाली.दररोज पाणी टँकर मागविले जात असल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.पाणी समस्येबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयाला दोन पत्र दिले होते. शुक्रवारी एमआयडीसीचे अधिकारी आव्हाड यांनी दावडी, पिसवली आणि गोळवली भागातील पाणी समस्या दूर करू. पण आम्हीही त्यांना सांगितले आहे की, तुम्ही ४ तारीख सांगताय पण आम्ही तुम्हाला ५ तारखेपर्यत मुदत देतो, जर या भागतील पाणी समस्या दूरझाली नाही तर भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक व या भागतील नागरिक येथे रस्तारोको आंदोलन करतील.आम्ही त्याच्या पात्राला मान देऊन उपोषण मागे घेतो मात्र त्यांनी पाणी समस्या दूर करावी.
माजी नगरसेवक रमाकांत पाटील म्हणाले, आम्ही आठ वर्षापासून पाणी समस्येबाबत एमआयडीसी विभागाशी भांडत आहोत.आठ वर्ष हे विभाग आम्हाला फक्त आश्वासन देतात.दोन दिवस पाणी पुरवठासुरळीत करतात पुन्हा चार दिवसांनी पाणी कमी दाबाने सोडतात. कधी कधी तर दोन दोन दिवस या भागात पाणीच सोडले जात नाही.४ तारखेपर्यत आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन थांबतो, पण जर का एमआयडीसीने दररोज पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर मात्र आम्हाला आंदोलन करावे लागेल.याला एमआयडीसी विभाग आणि पालिका प्रशासण जबाबदार राहतील.
माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर म्हणाले, एमआयडीसी आणि पालिका प्रशासण यांच्यात पाणीपुरवठाबाबत एकसूत्रीपणा नाही.त्याचा फटका नागरिकांना बसत असल्याने पाणी टंचाईला समोर जावे लागते.गेले महिनाभर दावडी, पिसवली, गोळवली या भागात पाणीच्या भीषण अवस्था आहे.आम्ही माजी नगरसेवकांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा केल्यानंतर एमआयडीसी विभाग व पालिका प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवीत असतात. म्हणूनच आम्ही २८ तारखेला उपोषणाची हाक दिली. होती. परंतु एमआयडीसी विभागाचे अधिकारी आव्हाड यांनी आम्हाला आश्वासन दिले आहें की ४ तारखेपर्यत पाणीपुरवठा सुरळीत करू. मात्र एमआयएमसीने जर दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.
यावेळी दावडी भागातील स्थानिक नागरिक बजराज पाटील म्हणाले, पाणी समस्या हे खूप गंभीर असून अनेक दिवसांपासून आम्ही पाण्याचे टँकर मागवतो. आमच्या खिशाला कात्री बसत असून दुसरीकडे पाणी बिलही भरावे लागते. आमची एवढीच मागणी आहें मी आम्हाला पुरेसे पाणी दया.