ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांचा आंदोलनाचा इशारा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण येथील छात्रपती शिवाजी चौकाजवळ फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहनचालक आणि फेरीवाले यांच्यात हाणामारी झाल्याचा प्रकार घडला होता. आता दिवा शहरातही रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने येथेही वाहचालक व फेरीवाले यांच्यात वाद होऊन वादाचे पर्यावसन हाणामारीत होण्याची शक्यता नकरता येत नाही. यावर गंभीर्याने लक्ष देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त यांना पत्र दिले आहे. लवकरात येथील अनधिकृत फेरीवाले हटविले नाही तर आंदोलन करू असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.
रोहिदास मुंडे म्हणाले, ,या फेरीवाल्यांना रस्त्यावर बसवणारे दिवा शहर बकाल करत आहेत.दिव्यात एकही रस्ता हा मोठा नाही अशा स्थितीत आहेत ते रस्ते फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून जनतेने चालायचे कुठून आणि वाहनचालकांनी वाहने कुठून चालवायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवा स्टेशन ते आगासन रस्ता,दिवा स्टेशन ते मुंब्रा देवी कॉलनी रस्ता हे सर्वच रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत.यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा मिळत नाही असे मुंडे यांनी या पत्रात म्हटले आहे. याबाबत सहायक आयुक्त यांनी तातडीने फेरीवाल्यांवर कारवाई करून दिवा स्टेशन रोड,मुंब्रा देवी कॉलनी रोड,दिवा आगासन रोड फेरीवाला मुक्त करावा.
फेरीवाल्यांना पालिकेने फेरीवाला झोन जाहीर करून त्याठिकाणी फेरीवाले पालिकेने बसवावेत जेणेकरून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होणार नाही. नवी मुंबईत ज्या पद्धतीने आतील रस्त्यांना किंवा गल्ली मध्ये फेरीवाला क्षेत्र असते,किंवा एखाद्या मैदानात फेरीवाले असतात त्या पद्धतीने दिवा शहरात रचना करावी. मुख्य रस्त्यावर असणारे फेरीवाले हटवून रस्ता नागरिकांसाठी मोकळा करावा अन्यथा याविरोधात नागरिकांच्या सहकार्य ने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.