शिवसेना नेते राजा केणी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

 


अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांचा गेल्या १५ जून रोजी वाढदिवस साजरा होणार आहे. या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हेमनगर येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात हे रक्तदान शिबीर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. शिवसेना शाखा कातळपाडा यांनी हे शिबीर आयोजित केले आहे.

राजा केणी हे एक उमद आणि उत्साही व्यक्तिमत्व आहे. गेली ३० वर्षांहून अधिक काळ राजा केणी हे राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात त्यांनी लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊन समाजाचे ऋण फेडण्यासाठी ते प्रयत्नशिल असतात. त्यांचा वाढदिवस हे केवळ निमित्त आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. आपल्या नेत्याचा वाढदिवस हा सामाजिक कार्याने साजरा व्हावा आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन रुग्णसेवा घडावी, हा उद्देश या मागे असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post