आदर्श पतसंस्थेचे रक्तदान शिबीर संपन्न

 


अलिबाग (धनंजय कवठेकर) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक   सुरेश पाटील यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आदर्श भवन, अलिबाग  येथे शनिवार (दि. ८ ) रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ५५  बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.    

 आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक  सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. यंदा देखील ८ जून रोजी आदर्श भुवन येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याला रक्तदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, संचालक  सतीश प्रधान, संचालक अनंत म्हात्रे, ,ॲड. वर्षा शेठ, विलाप सरतांडेल, जगदीश पाटील सुरेश गावंड, रामभाऊ  गोरीवले, एड. रेश्मा पाटील, महेश चव्हाण म, शाखा सल्लागार विजय पाटील ,  मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील आदी यावेळी उपस्थित होते. याच दिवशी आदर्श पतसंस्थेच्या चेंढरे शाखेचा   १८   वर्धापनदिन साजरा करण्यात आला. 


वर्धापनदिनानिमित्त चेंढरे शाखेत सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती.  दरवर्षी वर्षातून दोन वेळा संस्थेमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरामधे संकलन झालेले रक्ताचे कार्डस संस्थेमध्ये जमा केली जातात व गरजू रुग्णांना आदर्श मार्फत त्या कार्डस मचे वाटप करण्यात येते. गेली २० वर्षे संस्था हा उपक्रम राबवित आहे. आजपर्यंत जवळपास १५०० ते १७०० रुग्णांना मोफत रक्त पुरवठा या माध्यमातून करण्यात आला. या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. गोसावी सर व त्यांचा स्टाफ यांचे योगदान महत्वाचे असते , ते वेळोवेळी संस्थेला रक्तदान शिबिरासाठी मदत करीत असतात. जिल्ह्यातील बरेच रक्तदाते आपल्या रक्ताचे दान करून संस्थेला मदत करतात , यामध्ये आदर्श संस्थेचा स्टाफ सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन रक्तदान करतात , या शिबिराचे आयोजन करण्यासाठी संपूर्ण आदर्श परिवाराचे मोठे योगदान आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री अभिजीत पाटील यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post