जागतिक डॉक्टर डे व भारतीय न्यायसंहिता अंमलबजावणी दिन साजरा

 




अलिबाग, (धनंजय कवठेकर) : सोमवारी दि. १ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून मारुती मंदिर, हिराकोट तलाव, पोलिस स्टेशन, श्रीराम मंदिर, महावीर चौक ते पुन्हा अलिबाग समुद्र किनारा या मार्गाने डॉक्टर डे निमित्त वॉक्याथोनचे आयोजन रोटरी क्लब ऑफ अलिबाग शिशोर , माणुसकी प्रतिष्ठान, रायगड पोलीस, रायगड मेडिकल असोसिएशन लायन्स क्लब यांच्या सहयोगाने आयोजीत करण्यात आले होते.




या निमित्ताने अलिबागमधील सुप्रसिद्ध डॉक्टर्स, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य, ग्रामस्थ व रायगड पोलीस दल उपस्थित होते. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी सागर पाठक, रोटरी अध्यक्ष दिलीप कुमार भड, डॉ.निलेश म्हात्रे, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, रायगड मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॅ. निशिगंध आठवले, इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. राजेंद्र चांदोरकर, लायन्स क्लब डायमंड डॉ रेखा म्हात्रे, रोटरी समन्वयक तन्वी शेट्ये, विश्व स्पर्धा अकॅडमी तपस्वी गोंधळी, अलिबाग पोलीस स्टेशन निरीक्षक बागुल इतर मान्यवर उपस्थित होते.




आजपासून लागू होणाऱ्या भारतीय न्यायसंहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, (BNSS), भारतीय साक्ष अधिनियम (BSA) बद्दल माहिती अलिबाग पोलीस स्टेशन मध्ये सोमनाथ घार्गे यांनी दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. राजाराम हुलवान यांनी केले.




Post a Comment

Previous Post Next Post