अलिबाग, (धनंजय कवठेकर) : चांद्र्सेनीय कायस्थ प्रभू(सीकेपी) समाजाची राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय चांद्र्सेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत समिर गुप्ते यांचे नेतृत्वाखाली श्री एकविरा पँनलचे सर्वच्या सर्व बारा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले.
या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी समिर गुप्ते (ठाणे), विश्वस्तपदी अरुणा कर्णिक (मुंबई), शिरीष चिटणीस (सातारा), अशोक देशपांडे (पुणे), संजय दिघे (अंबरनाथ), नागेश कुळकर्णी (अलिबाग) यांची तर उपाध्यक्षपदी सुरभी गडकरी (इंदोर), मंदार कुळकर्णी (पुणे), चंद्रशेखर देशपांडे(कल्याण), तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्यपदी वर्षा दिघे, (मुंबई), चंद्रशेखर बेंद्रे (नागपूर), श्रीकृष्ण चित्रे (पनवेल) हे निवडून आले.
या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निनाद जयवंत व निलेश गुप्ते यांनी काम पाहिले. या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वाचे चांद्र्सेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी)समाज रायगड विभागिय समितीचे अध्यक्ष सुभाष राजे(रोहा), उपाध्यक्ष राजन टिपणीस (महाड), प्रदीप श्रुंगारपुरे (पेण), कार्यवाह अशोक प्रधान (अलिबाग), सहकार्यवाह नैनिता कर्णिक (मुरुड)या सर्वानी अभिनंदन केले आहे. तसेच सर्व ज्ञाती बांधवांनी अभिनंदन केले आहे.
