तरुणांनी सहभागी होण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे आवाहन
रायगड (धनंजय कवठेकर) : जिल्ह्यासाठी ३१३ जागांस्ठी होमगार्ड भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. जिल्हयातील तरुणांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांनी फक ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत. अर्ज प्रक्रिया २४ जुलैपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची १६ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. जिल्ह्यात ३१३ जागांसाठी ही भरती होत असून २५३ पुरुष तर ६० जागा महिलांसाठी आहेत. जिल्ह्यात होमगार्ड पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा, तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते ५० वर्षे असावे, भरतीसाठी रहिवासाचा पुरावा मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र, जन्म् दिनांक पुरास्याकरीता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक आर्ता पारण करीत असल्यास तत्सम् प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, महिन्याचे आतील पोलीस चातीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र अबश्यक लागणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
नोंदणीसाठीhttps://maharashtracong.gov. in/mahang/login1.php या संकेतस्थळावर नियम व अटींबाबत विस्तृत माहिती उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा कर इच्छित असलेल्या रायगड जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले.