Radhanagri dam update : राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले

 





पावसाचा जोर कमी झाल्याने पूरस्थिती नाही


राधानगरी :  राधानगरी धरण परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असल्यामुळे राधानगरी धरण गुरुवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणाचे चार स्वयंचलित दरवाजा गुरुवारी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत उघडले होते तर सायंकाळी साडेचार वाजता एक स्वयंचलित दरवाजा असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले तर शुक्रवारी पहाटे पाच वाजता एक स्वयंचलित दरवाजा उघडला होता व आज दुपारी एक वाजता एक स्वयंचलित दरवाजा पावसाचा जोर कमी झाल्याने सायंकाळी एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला आहे तसेच चार स्वयंचलित दरवाजे अजूनही सुरू असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रवीण पारकर यांनी दिली  


अधिक माहिती अशी की सलग तीन दिवस असलेला पावसाचा जोर शुक्रवारी सकाळी कायम राहिल्याने राधानगरी धरणाचे शुक्रवारी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी ते अकरा वाजून पन्नास मिनिटांनीपर्यंत चार स्वयंचलित दरवाजे उघडले तर सायंकाळी साडेचार वाजता एक स्वयंचलित दरवाजा असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले होते. शुक्रवारी पहाटे पाच वाजता एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून असे सहा स्वयंचलित दरवाजे उघडले होते.  शुक्रवारी दुपारी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने  एक वाजून चार मिनिटांनी एक तर सायंकाळी एक स्वयंचलित दरवाजा असे मिळून दोन दरवाजे बंद झाले आहेत त्यामुळे धरणाची पाण्याची पातळी ३४७. १६ फूट तर पाणीसाठा ८२९६.३४ दशलक्ष घनफूट झाला आहे.


धरण १०० टक्के पूर्ण भरल्याने चार स्वयंचलित दरवाज्यातून प्रति सेकंद ५७१२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. बीओटी विद्युत ग्रहामधून पंधराशे क्युसेक्स असा एकूण ७२१२ क्यूसेक्स पाणी नदीपात्रामध्ये विसर्ग होत असल्याने नदीकडच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आव्हान भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर व राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post