वनसंवर्धन दिन मोठ्या उत्साहात साजरा






सावदा (जळगाव) :  महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत प्राथमिक विद्या मंदिर सावदा येथे वनसंवर्धन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.  


 २३ जुलै हा दिवस वनसंवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो. हा दिवस निसर्गातील प्रत्येक गोष्टी जसे झाडे, डोंगर, नद्या, वने, प्राणी, पक्षी यांचे संवर्धन व्हावे आणि समाजात नैसर्गिक साधनसंपत्ती विषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून साजरा केला जात असतो. याप्रसंगी विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत वृक्ष लागवड करत वृक्ष संवर्धनासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. 


मानवाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साधला. सुमारे २० लाख वर्षापासून पर्यावरणाचा एक घटक म्हणून वावरणारा मानव हा बहुतेक कालावधीत पर्यावरणीय घटकांनी नियिमित झालेला भाग होता. पण मानवी संस्कृती १०हजार वर्षाच्या टप्प्यात शेतीपासून अंतराळाचा वेद घेण्यापर्यंत मानवाने जे टप्पे गाठले व ओलांडले त्यातून विकास झाला पण विकासाबरोबर पर्यावरणाची किती हानी झाली त्याच्या विचार मात्र मानवाने सोयीस्करपणे दुर्लक्षित केला असे प्रतिपादन कृषीदुत संकेत शिरसाठ यांनी वेक्त केले. 


 कार्यक्रमाला प्राथमिक विद्यामंदिर सावदा च्या मुख्याध्यापिका उशा तायडे शिक्षक कुंदन सरोदे, अमोल भारंबे, गणेश साफकरसोबत कृषीदुत प्रणव बानाईत,लहू चव्हाण, श्रेयस पाटील, मोहीत साळुंखे, सुजल सरोदे, विशाल इंगळे, रोहित पावरा, संकेत शिरसाठ यांचा सहभाग होता. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. शैलेश तायडे सर, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. बी .सदार सर व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post