सहाय्यक आयुक्तांविना दिव्याचा कारभार सुरू






 ठाणे मनपाचे दिव्याकडे दुर्लक्ष


दिवा, (आरती मुळीक परब) :  महिनाभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे दिव्यात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याच्या समस्या, पाणी तुंबणे, अर्धवट नाले, गटार सफाईने नागरिक हवालदिल तरी देखील ठाणे मनपाचे दिव्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्यातील दिव्यात मोठ्या प्रमाणात नालेसफाई न झाल्याने नागरिकांच्या घरात घाण पाणी गेले. मात्र १५ दिवसां पासून ठाण्याच्या दिव्यातील प्रभाग समितीचा कारभार सहाय्यक आयुक्तांविना सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे महानगर पालिका कधी दिव्याकडे लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


ठाणे मनपा क्षेत्रातील दिव्याचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांची १५ दिवसांपूर्वी बदली झाली आहे. सहाय्यक आयुक्त असलेले अक्षय गुडदे यांची बदली करून तिथे सचिन बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सचिन बोरसे यांनी आज पर्यंच पदभार स्वीकारला नसल्याने ठाणे मनपाला आता नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्यातच काल मनसेच्या दिव्यातील सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट चर्चेत आली होती. 


यामध्ये प्रामुख्याने दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त कोण? ९ जुलै रोजी दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची बदली झाली, परंतु नवीन सहाय्यक आयुक्तांनी पदभार स्वीकारलेला नाही आणि जुने साहाय्यक आयुक्त प्रभाग समितीत येत नाहीत, अशी माहिती त्यात आहे.




 
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा पावसाळ्यात सामना करावा लागत आहे. मुंब्रा, दिवा कुठेही नाले, गटार सफाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांसमोर समस्यांचे डोंगर उभे राहिले असताना दिवा ठाण्यात येतो आहे की नाही? असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. कधीतरी दिव्याकडे ठाणे मनपाने लक्ष द्यावे.
 - शरद पाटील, मनसे, विभाग अध्यक्ष

Post a Comment

Previous Post Next Post