कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत शालेय पोषण दिवस संपन्न

 



  शिक्षण सप्ताह अंतर्गत इको क्लबचा उपक्रम 


डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत शिक्षण सप्ताह अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली इको क्लब उपक्रम व शालेय पोषण दिवस काल अत्यंत उत्साहात  साजरा करण्यात आला.




शिक्षण सप्ताहातील  नियोजनानुसार पर्यावरणातील गंभीर समस्या, हवामान बदल, मतदान आणि संसाधनांची कमतरता याबद्दल जागरुकता निर्माण करणे, पर्यावरण संवर्धन करणे, विद्यार्थ्यांनी व पालकांनी मिळून वृक्षारोपण करणे ह्यासारखे विविध विषयांशी  निगडित उपक्रम राबविण्यात आले. शालेय पोषण दिवस अंतर्गत विद्यार्थ्यांना पोषक आहाराचे महत्त्व सांगितले गेले. विद्यार्थ्यांनी देखील सर्व उपक्रमात आनंदाने सहभाग घेतला.





Post a Comment

Previous Post Next Post