महापौरांच्या आदेशानुसार इतरांची चौकशी सुरू
नवी दिल्ली : दिल्लीतील राजेंद्र नगर भागात शनिवारी झालेल्या अपघातात आयएएसची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्ली सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एमएसडीच्या महापौर शैली ओबेरॉय यांच्या आदेशानुसार, अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा राजेंद्र नगर परिसरातील तळघरांमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेली १३ कोचिंग सेंटर्सना सील करण्यात आले.
राऊ कोचिंग सेंटरमधील दुर्घटनेनंतर, एमसीडी झोपेतून जागी झाली आणि १३ कोचिंग सेंटर सील केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच इतर भागातील कोचिंग सेंटर्सचीही तपासणी केली जाईल आणि त्यात काही त्रुटी आढळून आल्यास, बिल्डिंग उपनियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोचिंग सेंटर्सला सील करण्यात येईल.
यामध्ये आयएएस गुरुकुल, चहल अकादमी, प्लुटस अकादमी, साई ट्रेडिंग, आयएएस सेतू, टॉपर्स अकादमी, दैनिक संवाद, सिव्हिल डेली आयएएस, करिअर पॉवर, ९९ नोट्स, विद्या गुरू, मार्गदर्शन आयएएस, इझी फॉर आयएएस यांचा समावेश आहे. हे कोचिंग सेंटर राजेंद्र नगरच्या वेगवेगळ्या भागात सुरू असल्याची माहिती एमसीडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये बेसमेंटमध्ये नियमांचे उल्लंघन करून कोचिंग सुरू असल्याचे आढळून आल्याने घटनास्थळी सीलबंद करून नोटीस चिकटवण्यात आल्या आहेत.