श्री मारू कुमावत समाज सेवा ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 



डोंबिवली ( शंकर जाधव )  : शहरातील मारू कुमावत समाज सेवा ट्रस्ट माध्यमातून चातुर्मास प्रारंभाचे औचित्य साधून सातवा स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्वेकडील दावडी विभागातील पाटीदार सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम माताजीची आरती, आईचा नैवेद्य आणि मुलाचे भोग, दिवा लावणे, सन्माननीय अतिथी सन्मान, मुलांचा नृत्य कार्यक्रम, २०२५ ची बोली, विद्यार्थ्यांचा सत्कार, महाप्रसाद, पुढील वर्षकरिता बोली असा साचेबद्ध रंगतदार कार्यक्रम होता.



सदर कार्यक्रम सेवा समितीचे अध्यक्ष मोहनलाल टीमाजी मेवाडा, कोषाध्यक्ष मोहनलाल रुपाजी मंडोरा, सचिव लसाराम भेराजी मेवाडा, उपाध्यक्ष घीसुलाल तलसाजी मेडतीया, उपकोषाध्यक्ष जवानाराम नेमाजी चांदोरा, उपसचिव दिपाराम भेराजी टाक, कमिटी सदस्य प्रविणकुमार जसाजी रामीणा, सुरेश कुमार तेजाजी रोटोगंण, शंकरलाल पकाजी रामीणा, जेठाराम नाराणजी वागरी, भंवरलाल दलाजी धनारीया, मांगीलाल जानाजी मेवाडा यांच्या नियोजनाखाली कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.




यावेळी अध्यक्ष मोहनलाल टीमाजी मेवाडा म्हणाले, समाज एकत्रित येऊन काही समाजाप्रती ठोस कार्य करण्यासाठी अशा कार्यक्रमाची योजना करण्यात येत. यामुळे सर्वांची ओळख होऊन जवळीकता वाढते. अशा कार्यक्रमातून समाजातील मान्यवर व्यक्तींची ओळख होते. ज्या शहरात उद्योग, व्यवसाय करतो त्या शहरासाठी सत्कर्म करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे उपस्थित समाजबांधवाना सांगितले.



दरम्यान यावेळी समाजाप्रती केलेल्या बहुमूल्य कार्याबद्दल विशेष योगदान केलेल्या मान्यवरांचा गौरव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. समाजातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे पुढील वर्षाच्या महाआरतीसाठी बोली व चढाव मोठा रंगतदार झाला. समाजाच्या कार्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकजण या बोली-चढाव कार्यात सहभागी झाले होते. माताजीची महाआरती, दिप प्रज्वलन, महाप्रसाद कार्यक्रम आणि स्नेहसंमेलन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.




Post a Comment

Previous Post Next Post