उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचा गुरुपौर्णिमेच्या संध्या समई स्तुत्य उपक्रम
अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : गुरुपौर्णिमेच्या दिनाचे औचित्य साधून खंडाळे येथील श्री सिद्धी साई मंदिरामध्ये नुकतेच संस्थापिका उज्ज्वला चंदनशिव यांच्या उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अंतर्गत श्री साई मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांची तसेच खंडाळे गावातील सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी सदरील आरोग्य तपासणीनंतर ओंकार काटले प्रस्तुत सप्तसुरांची मैफिल हा रंगतदार बहारदार कार्यक्रम साई मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी साजरा करण्यात आला.
यावेळी साईबाबांची भक्तीपर गीते आपल्या सुरेल आवाजात गायन करून पूजा पाटील, निलेश डबरे, परिक्षीत पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी माणुसकी प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत सर्व कलाकारांना माणुसकी सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. डॉ. राजाराम हुलवान, डॉ. राकेश सिंग यांनी उपस्थितांचे आरोग्य तपासणी करून योग्य तो औषधोपचार केला. सदरील कार्यक्रमासाठी जन शिक्षण संस्थान रायगड अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, तेजस्विनी फाउंडेशन अध्यक्षा ॲड. जिविता पाटील, विश्वस्त पदाधिकारी मिनाक्षी केणी, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था समन्वयक कुमार ठाकूर,मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमित पाटील यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत उत्कृष्ठ निवेदन केले. श्री साई संस्थान गुरुजी प्रकाश पानसरे, डॉ नितीन गांधी व विधी तज्ञ जिविता पाटील यांच्या हस्ते सहजानंद आध्यात्मिक गोपाळ निवास ज्येष्ठ नागरिक हॉस्टेल पुस्तिकेचे औपचारिक अनावरण करण्यात आले.