केडीएमसीविरोधात मनसेची खड्डे दर्शन स्पर्धा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण - डोंबिवली महापालिकेकडून खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षातही कामात संथगतीने सुरू आहे. खड्ड्यांतून वाहन चालविताना चालकांचा अपघात होण्याची शक्यता आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनसेतर्फे शहरातील चौका चौकात 'सेल्फी विथ खड्डा'अशा आशयाचे उपहासात्मक बॅनर लावण्यात आले.तसेच मनसेने खड्डे दर्शन स्पर्धा आयोजित केली आहे. या बॅनरच्या माध्यमातून आपल्या परिसरातील खड्ड्यांचे सेल्फी 'आम्हाला पाठवा व आकर्षक बक्षीस जिंका' असे आवाहन मनसेच्या वतीने करून करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात खड्डे उपलब्ध करून दिल्याबद्दल कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे आभार देखील मानण्यात आले आहे.