- १८ डबे रुळावरून घसरले ; २० जखमी
- मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये
- मोठ्या जखमींना ५ लाख रुपये
- किरकोळ जखमींना १ लाख
खरसावन: रेल्वे अपघाताच्या संख्या वाढत आहेत. झारखंडमधील सरायकेला-खरसावन जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरले, यात दोन जण ठार तर २० जखमी झाले आहेत. दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागांतर्गत जमशेदपूरपासून ८० किमी अंतरावर असलेल्या बारांबूजवळ पहाटे ३.४५ वाजता ही घटना घडली.
सोमवारी रात्री हावडाहून निघालेल्या हावडा-मुंबई मेलचे १८ डबे बाराबांबूजवळ रुळावरून घसरले असून बचावकार्य सुरू आहे तसेच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. १६ प्रवासी डबे, एक पॉवर कार आणि एक पॅन्ट्री कार यांचा समावेश असून जखमी प्रवाशांना बारांबू येथे वैद्यकीय मदत देण्यात आली आणि त्यांना चांगल्या उपचारांसाठी चक्रधरपूरला पाठवण्यात आल्याचे येथे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्य स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे अपघाताची माहिती सेराईकेला-खरसावन जिल्ह्यातील खरसावन ब्लॉकच्या पोटोबेडा येथून मिळाली. या अपघातानंतर काही एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या असून
यामध्ये २२८६१ हावडा-तितलागड-कांताबंजी इस्पात एक्स्प्रेस आणि १२०२१ हावडा-बार्बिल जनशताब्दी एक्स्प्रेसचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केले आहे.
मृतांच्या नातेवाईकांना १० लाख
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अधिकाऱ्यांना मदतकार्य जलद करण्याचे आणि जखमींना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमी प्रवाशांना बाराबांबूमध्ये वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यांना चांगल्या उपचारांसाठी चक्रधरपूरला नेण्यात आले," असे एसईआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेने प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, मोठ्या जखमींना ५ लाख रुपये, किरकोळ जखमींना १ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे, असे चक्रधरपूरचे वरिष्ठ डीसीएम आदित्य कुमार चौधरी यांनी सांगितले. रेल्वे सीपीआरओनुसार, बचाव आणि मदत कार्य पूर्ण झाले आहे.
हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला
- टाटानगर: ०६५७२२९०३२४
– चक्रधरपूर: ०६५८७ २३८०७२
- राउरकेला: 06612501072, 06612500244
- हावडा: 9433357920, 03326382217
– रांची: ०६५१-२७-८७११५.
- HWH हेल्प डेस्क: 033-26382217, 9433357920
- SHM हेल्प डेस्क: 6295531471, 7595074427
- KGP हेल्प डेस्क: ०३२२२-२९६७६४
- सीएसएमटी हेल्पलाइन ऑटो क्रमांक ५५९९३
– P&T ०२२- २२६९४०४०
– मुंबई: ०२२-२२६९४०४०
- नागपूर: ७७५७९१२७९०