दिवा, (आरती मुळीक परब) : स्वातंत्र्य दिनानिमित्त दिवा शहरात अवधूत हॉलमध्ये भाजप दिवा- शिळ मंडळ आयोजित व उत्तर भारतीय परिवार कजरी महोत्सवातर्फे नारीशक्ती सन्मान सपना भगत यांच्या हस्ते उषा मुंडे यांना देऊन गौरवण्यात आला.
उषा मुंडे या आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान तर्फे आगासन, दिवा भागात समाजसेवेचे कार्य बरीच वर्षे करत आहेत. दिवा शहरातील नागरिकांचे समस्या, महिलांचे प्रश्न सोडवत आहेत, महिलांना योग्य आरोग्य उपचार देणे, केंद्र सरकार राज्य, सरकार योजना नागरिकांना कशा मिळतील यासाठी त्यांचा प्रयत्न नेहमी असतो. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी दिवा- शिळ मंडळा तर्फे सत्कार करण्यात आला. त्यांना श्रीफळ शाल, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या सर्व महिला उपस्थित होत्या.