दिवा, (आरती मुळीक परब) : स्वात्रंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभर सुरू असलेल्या घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत ठाणे महानगरपालिके तर्फे दिवा प्रभाग समितीच्या वतीने गुरुवारी नॅशनल शाळेतील विद्यार्थ्यां सोबत तिरंगा रॅली काढली.
१५ ऑगस्टच्या आधी घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत नॅशनल शाळेतील १०० ते १५० विद्यार्थी आणि दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडघे यांच्या सह पालिका काही कर्मचाऱ्यांसोबत दिव्यातील नॅशनल शाळा ते एस. एम. जी शाळेपर्यंत तिरंगा रॅली काढली. या रॅलीत विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षक , पालक आणि दिवा प्रभाग समितीतील इतर मोठे अधिकारी ही उपस्थित होते.