अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचातीमधील बापळे येथे पोथीपुराण पारायण समाप्तीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती. यावेळी दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष तथा,माजी समाजकल्याण सभापती दिलीप (छोटमशेठ) भोईर यांनी दर्शनाचा लाभ घेतला व ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी दिलीप (छोटमशेठ) भोईर यांच्याकडे बापळे गावामधील वरांबीमातेचे मंदिर उभारून देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने दीड लक्ष रुपये त्यांच्याकडे सुपूर्द करत संपूर्ण देवळाच्या बांधकामाचा खर्च उचलण्याचा शब्द येथील ग्रामस्थांना दिला. छोटमशेठ यांच्या या दातृत्वगुणाचे कौतुक करत ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी वरंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुधीर चेरकर, झिराड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेश माने, भाजप दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश पालकर, अलिबाग तालुका युवा मोर्चा चिटणीस प्रथमेश मांजरेकर, अलिबाग मंडल सोशल मीडिया संयोजक अमित म्हात्रे, चिंचोटी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयवंत ठाकूर हे उपस्थित होते.