डोंबिवली ( शंकर जाधव ) : बदलापूरमधील एका लहान मुलीवर लैगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यात संताप व्यक्त होत असताना आता राज्य सरकारने अद्यादेश काढून प्रत्येक शाळेत कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी अहवाल बंधकारक,शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी ठेवणे असे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्ठ मंडळाने डोंबिवलीमधील शाळांमध्ये जाऊन तेथील पत्रक दिले. या पत्रकात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , बस चालक, शिपाई या सगळ्यांचे चारित्र्य पडताळणी अहवाल,पोलीस सर्टिफिकेट करूनच घेण्यात अशी मागणी केल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहरअध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी संगितले.


