Shikhar Dhawan : शिखर धवनची क्रिकेटमधून निवृत्ती




नवी दिल्ली :  भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.  अनेक दिवसांपासून भारतीय संघात स्थान मिळवू न शकलेल्या शिखर धवनने आज, शनिवारी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्जचा कर्णधार असलेल्या धवनने क्रिकेटला अलविदा करताना प्रशिक्षक, सहकारी आणि समर्थकांचे आभार मानले.


ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये शिखर धवनने भावनिकरित्या सांगितले की भारतासाठी खेळणे हे त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि आता त्याच्यासाठी पुढे जाण्याची वेळ आली आहे. त्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्याने कुटुंब, बालपणीचे प्रशिक्षक, बीसीसीआय आणि डीडीसीए यांचे आभार मानले. माझ्या क्रिकेट प्रवासाचा अध्याय संपवताना मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता घेऊन जात आहे. प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद! जय हिंद!


शिखर धवनने १६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १७ शतके आणि ३५ अर्धशतकांसह ६७९३ धावा केल्या आहेत. या डावखुऱ्या फलंदाजाने १२२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८४९९ धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी शेवटचा वनडे २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्याने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०२१ खेळला होता. २०१८ पासून तो कसोटी संघातून बाहेर होता.





Post a Comment

Previous Post Next Post