पिकलबॉल व पॅडल गेम्‍समध्‍ये मासिक ३५ टक्‍क्‍यांची वाढ: हडल

 


मुंबई : पिकलबॉल व पॅडल भारतभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेत असताना हडल या भारतातील आघाडीच्‍या स्‍पोर्ट्स-टेक प्‍लॅटफॉर्मला दोन प्रमुख स्‍पोर्टिंग इव्‍हेण्‍ट्स: मान्‍सून पिकलबॉल चॅम्पियनशीप २.० आणि इंडियन पॅडल टूर ३.० साठी बुकिंग अँड कम्‍युनिटी पार्टनर म्‍हणून सहयोगाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. हडल आपल्‍या प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून विनासायास तिकिटींग व खेळाडूशी सहभागी होण्‍याची सुविधा देईल, तसेच आपल्‍या वैविध्‍यपूर्ण  समुदायाच्‍या माध्‍यमातून उच्‍च नोंदणी व सहभागाला गती देण्‍यास मदत देखील करेल. या सहयोगामधून भारतात पिकलबॉल व पॅडलच्‍या मोठ्या विकासाला चालना देण्‍याप्रती हडलची कटिबद्धता दिसून येते, जेथे या स्‍पोर्ट्समध्‍ये २०१९ आणि २०२२ दरम्‍यान १५९ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली आहे.

हडलला पिकलबॉल व पॅडल गेम्‍समध्‍ये मासिक ३५ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली आहे, जेथे दिल्‍ली एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरू यासारख्‍या शहरांमधून सहभाग वाढत आहे. दिल्‍ली एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, अहमदाबाद, वडोदरा, इंदौर आणि भोपाळ अशा अनेक शहरांमध्‍ये हडलचे सहयोगी आहेत. हैदराबाद, कोलकाता व चेन्‍नईमध्‍ये आगामी विस्‍तारीकरणांसह हडल खेळाडूंना सहकारी क्रीडाप्रेमींसोबत कनेक्‍ट होण्‍यासाठी अव्‍वल स्‍थळ व संधी उपलब्‍ध होण्‍याची खात्री घेत आहे.

हडलचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुहैल नारायण म्‍हणाले, “भारतात पिकलबॉल व पॅडलच्‍या लोकप्रियतेमधील वाढ अत्‍यंत उल्‍लेखनीय आहे, जे विविध वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये लोकप्रिय ठरले आहेत. ही वाढ फक्‍त आकडेवारीपर्यंत मर्यादित नाही, तर त्‍यामधून या खेळांप्रती वाढती आवड आणि वाढता समुदाय दिसून येतो. हडलमध्‍ये आम्‍ही या गतीला अधिक चालना देण्‍याप्रती, तसेच सर्व वयोगटातील खेळाडूंना प्रगती करण्‍यास आवश्‍यक असलेली संसाधने, स्‍थळे आणि समुदाय उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेण्‍याप्रती समर्पित आहोत. आमचा या खेळाडूंना प्रत्‍येकाच्‍या जीवनाचा विनासायास व अंतर्गत भाग बनवण्‍याचा दृष्टिकोन आहे आणि या प्रमुख इव्‍हेण्‍ट्ससोबतच्‍या आमच्‍या सहयोगांमधून ती कटिबद्धता दिसून येते.''

ग्‍लोबल स्‍पोर्ट्सद्वारे २५ ऑगस्‍ट २०२४ पर्यत आयोजित करण्‍यात आलेल्‍या मान्‍सून पिकलबॉल चॅम्पियनशीप २.० मध्‍ये जगभरातील ८०० हून अधिक सहभागी १००,००० अमेरिकन डॉलर्स बक्षीसाची रक्‍कम जिंकण्‍यासाठी स्‍पर्धा करताना पाहायला मिळतील. आंतरराष्‍ट्रीय स्‍टार्स जसे माजी वर्ल्‍ड नं. १ जॉसेलिन ‘जे' डेव्हिलियर्स ऊर्फ फ्लाईंग फ्रेंचमन, मेघन फ्यूज, रायलर डीहार्ट, रॉब ननरी आणि थाडीया लॉक या इव्‍हेण्‍टचे मुख्‍य आकर्षण असतील. हडल खेळाडूंना ग्‍लोबल स्‍पोर्ट्स पिकलबॉल स्‍थळांवर वापरासाठी ४ लाखांहून अधिक क्रेडिट ऑफर करेल.

२३ ऑगस्‍ट ते २५ ऑगस्‍ट २०२४ पर्यंत मुंबईतील पॅडलपार्क येथे आयोजित करण्‍यात येणारे इंडियन पॅडल टूर ३.० अद्वितीय फ्रँचायझी-आधारित फॉर्मेट असेल, ज्‍यामध्‍ये व्‍यावसायिक व अर्मेचर खेळाडूंचे एकत्रीकरण असेल. हडल विजेत्‍यांना प्रत्‍येकी १०,००० क्रेडिट्स देईल, ज्‍यामुळे खेळाडूंचा अनुभव अधिक उत्‍साहित होईल आणि समुदाय सहभागाला चालना मिळेल.

Post a Comment

Previous Post Next Post