२०२७ मध्ये न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना होणार भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश



नवी दिल्ली :   देशाच्या न्यायिक प्रमुखाच्या नियुक्तीमध्ये ज्येष्ठतेचे सातत्याने पालन केल्यास न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना या भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश ठरतील.  सरन्यायाधीश म्हणून त्यांचा कार्यकाळ केवळ ३७ दिवसांचा असेल. ज्येष्ठतेच्या दृष्टीने, न्यायमूर्ती नागरथना सप्टेंबर २०२७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.  देशाचे माजी सरन्यायाधीश ईएस वेंकटरामय्या यांची कन्या नागरथना, १३ वर्षे कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या आणि २०२१ पासून सर्वोच्च न्यायालयात आहेत.  देशाचे विद्यमान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यावर्षी १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे ज्येष्ठतेच्या आधारावर सरन्यायाधीशपदी विराजमान होतील. 


सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या सेवाज्येष्ठतेनुसार सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर पुढील सहा वर्षांत सात मुख्य न्यायमूर्ती असतील, मात्र न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला वगळता अन्य पाच न्यायाधीशांचा कार्यकाळ मुख्य न्यायमूर्ती एक वर्षांपेक्षा कमी असतील. चिफ जस्टीस या नात्याने न्यायमूर्ती सूर्यकांत यांना एक वर्षापेक्षा जास्त कालावधी मिळेल CJI आणि न्यायमूर्ती परडीवाला यांना दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी मिळेल.



 आतापर्यंत स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयात केवळ ११ महिला न्यायाधीश झाल्या आहेत. त्यापैकी न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती नागरथना सध्या कार्यरत आहेत. न्यायमूर्ती कोहली १ सप्टेंबरला निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती फातिमा बीवी ऑक्टोबर १९८९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्या, परंतु पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशांना आणखी तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post