डोंबिवलीत गणपती आगमन सोहळ्यात महिलांच्या हाती बॅनर
डोंबिवली (शंकर जाधव) : बदलापूर शहरात एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप करत बदलापूरकरांनी तब्बल दहा तास रेल्वे रोको आंदोलन केले होते.
राज्यात संतापाची लाट उसळली असताना डोंबिवलीलतील महिलांनी संताप व्यक्त केला. एका रात्रीत नोटबंदी, एका रात्रीत लॉकडाऊन, एका रात्रीत सरकार बदलते मग नराधमाला एका दिवसात फाशी का होऊ शकत नाही ?' असा उल्लेख असलेले बॅनर गणपती आगमन सोहळ्यादरम्यान महिलांच्या हाती पहावयास मिळाले. गजानन ढोल ताशा पथकातील महिलांनी असे बॅनर झळकावून आपला संताप व्यक्त केला. सरकारपर्यत आपले म्हणणे पोहोचविण्याकरता अशा सोहळळ्यातून महिला अशा प्रकारचे बॅनर हाती घेत असल्याचे दिसून येत आहे.

