मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा महिला अध्यक्ष श्रावणी कामत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
लोणावळा, (श्रावणी कामत) : क्राईम रिपोर्टर वेलफेयर असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष तसेच मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा महिला अध्यक्ष श्रावणी कामत यांच्या वाढदिवसानिमित्त व इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्ड च्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळा येथील जिल्हा. प.शाळा क्र, १ शाळा क्र २,भुशी गावातील शाळा क्र. ४ व अंगणवाडी येथे स्काऊट वस्तू आणि खाऊ देऊन साजरा करण्यात आला.
या वेळेस रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर, संपादिका रेखा भेगडे, पत्रकार सुनील मस्के तसेच लोणावळा गिल्ड च्या अध्यक्षा रत्नप्रभा गायकवाड, सचिव हेमलता शर्मा, शशिकांत भोसले, पूर्वा गायकवाड, अंबिका गायकवाड, शाळेच्या प्राध्यापिका चित्रा जोशी, प्रतिभा दरेकर, अनंत भागवत, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.