रशियन हेलिकॉप्टरमध्ये एकूण २२ जणांचा समावेश
रशिया : रशियन हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. हेलिकॉप्टरचा अजूनपर्यंत कोणताही ठावठिकाणा न लागल्याने हेलिकॉप्टर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेलिकॉप्टर बेपत्ता झालेल्या रशियन हेलिकॉप्टरमध्ये एकूण २२ लोक होते ज्यात तीन क्रू सदस्यांचा देखील समावेश आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाच्या Mi-८T हेलिकॉप्टरने शनिवारी रशियाच्या पूर्व भागात असलेल्या कामचटका द्वीपकल्पातून उड्डाण केले. हेलिकॉप्टरमध्ये तीन क्रू मेंबर्ससह एकूण २२ जण होते. रशियाच्या फेडरल एअर ट्रॅफिक एजन्सीने सांगितले की हेलिकॉप्टरने वाचकाझेट्स तळावरून उड्डाण केले होते, परंतु हेलिकॉप्टर वेळेवर त्याच्या स्थानावर न पोहोचल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली. Mi-८T हे ट्विन-इंजिन हेलिकॉप्टर आहे, ज्याची रचना १९६० मध्ये करण्यात आली होती. रशियाशिवाय हे हेलिकॉप्टर इतरही अनेक देश वापरतात, या हेलिकॉप्टरला अपघातांचाही मोठा इतिहास आहे.