Hariyana assembly elections 2024 : हरियाणा विधानसभा निवडणूक पूढे ढकलणार ?




भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी


हरियाणा : हरियाणातील आगामी निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार आता ७ किंवा ८ ऑक्टोबरला निवडणुका होऊ शकतात. भारतीय जनता पक्षाने सुट्ट्यांचे कारण पुढे करून निवडणुकीची तारीख बदलण्याची मागणी केली आहे, या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांनी निवडणूक आयोगाला विनंती केल्याचे म्हटले जात आहे,  निवडणूक आयोग त्यावर विचार करत आहे. याप्रकरणी मंगळवारी निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात औपचारिक घोषणा केली जाऊ शकते.  निवडणूक आयोगाने सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊनच निवडणूक जाहीर केल्या, मात्र आता भाजपने आक्षेप घेतल्यावर निवडणूक आयोग स्वतःच्या मतावर ठाम राहते की भाजपच्या महाल सहमती दर्शवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 


भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांनी १ ऑक्टोबरच्या आसपास वीकेंड आणि सुट्ट्या असल्याचे मत मांडले आहे. त्यामुळे लोक बाहेर फिरायला जाऊ शकतात, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. पुढील तारीख ठरवताना मतदानाच्या तारखेच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी नसावी, हे ध्यानात ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे. असे झाल्यास जास्तीत जास्त लोक मतदानात भाग घेऊ शकतील.


 बडोली यांनी पत्रात म्हटले आहे की, २८ व २९ तारखेला शनिवार व रविवार असल्याचे बडोली यांनी पत्रात सांगितले आहे. मतदानानिमित्त १ ऑक्टोबरला सुट्टी आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि ३ तारखेला अग्रसेन जयंती आहे.  अशा परिस्थितीत लोक सुट्टीसाठी राज्याबाहेर जाऊ शकतात, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. यावर मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल म्हणाले, त्यांना भाजपकडून पत्र मिळाले असून त्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहे.


भाजपपाठोपाठ आता बिष्णोई समाज महासभेनेही मतदानाची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. महासभेचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया म्हणाले की राजस्थानमधील बिकानेर येथील गुरू जंभेश्वर भगवान यांच्या समाधी स्थळावर दरवर्षी अमावस्येच्या दिवशी मोठ्या जत्रेचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये हरियाणासह संपूर्ण देशातून बिष्णोई समाजाचे लाखो भाविक या जत्रेत सहभागी होत असतात. यावेळी आसोजच्या अमावास्येला १ ऑक्टोबर रोजी मुक्तिधाम येथे जत्रा भरणार आहे. जत्रेमुळे बिष्णोई समाजाचे बरेच लोक निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाहीत, त्यामुळे मतदानाची तारीख बदलण्यात यावी.


निवडणूक आयोगाने १६ ऑगस्ट रोजी घोषित केले होते की हरियाणामध्ये १ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होतील आणि ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होतील. भाजपचा सलग तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी प्रयत्न असल्यामुळे हा खेळ मांडल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकी दरम्यान सुट्टी असल्यामुळे अधिक मतदान होईल या हेतूनेच निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबरची तारीख निवडली. मात्र आता भाजपला स्वतःच्या मर्जीनुसार निवडणूक पाहिजे असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर निवडणूक आयोग स्वतःच्या मतावर ठाम राहते की भाजपच्या महाल सहमती दर्शवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 



 सध्याच्या हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपत आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत उष्णतेमुळे मतदानाची टक्केवारी सुमारे पाच टक्क्यांनी घसरली होती. २५ मे रोजी कडक ऊन असल्याने लोक मतदानासाठी घराबाहेर पडले नाहीत. २०१९ मध्ये जवळपास ७० टक्के मतदान झाले होते, तर गेल्या मे महिन्यात ६५ टक्के मतदान झाले होते.




Post a Comment

Previous Post Next Post