पुणे : मुंबईहून हैदराबादला जाणारे खासगी हेलिकॉप्टर पुण्यात कोसळले. प्राथमिक माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये एकूण चार प्रवासी होते. खासगी हेलिकॉप्टर अपघाताबाबत पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील पौड गावात हा अपघात झाला. हेलिकॉप्टर एका खासगी विमान कंपनीच्या मालकीचे आहे. या अपघातात नेमके किती प्रवासी जखमी झाले याची माहिती संकलित करण्यात येत असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात पुण्यातील एका भागात झाला आहे जिथे जास्त पाऊस आहे. सध्या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमधील चार जणांपैकी पायलटला दुखापत झाली आहे. अपघातात जखमी झालेल्या पायलटला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसपी पंकज देशमुख यांनी सांगितले की, पायलट व्यतिरिक्त उर्वरित तीन प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे.