Mithila palkar : मिथिला पालकरची ज्‍युलिओच्या ब्रँड ॲम्‍बेसिडरपदी नियुक्‍ती

 


मुंबई, : सुसंस्‍कृत व मोहक व्‍यक्तिमत्त्वासाठी, तसेच 'लिटल थिंग्‍ज' आणि 'द गर्ल इन सिटी'मधील उत्‍साही भूमिकांसाठी ओळखली जाणारी मिथिला पालकर मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा आहे. नवीन प्रवासाला सुरूवात करत तिची ट्रस्‍टेड एक्‍सक्‍लुसिव्‍ह सिंगल्‍स क्‍लब ज्‍युलिओची (Juleo) ब्रँड ॲम्‍बेसिडर म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. तिने साकारलेल्‍या भूमिकांमधून प्रामाणिकपणा, उत्‍साही आणि खरे प्रेम व खऱ्या नात्‍यांचा शोध घेणारी आधुनिक महिला म्‍हणून तिचे व्‍यक्तिमत्त्व दिसून आले आहे.

पारंपारिक भारतीय मॅचमेकर्सकडून प्रेरणा घेत ज्‍युलिओ आधुनिक डेटिंग व विवाह अधिक जबाबदार आणि उत्तम करणाऱ्या दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून अस्‍सल, रिअल-लाइफ मीटिंग्‍जना चालना देण्‍यावर लक्ष केंद्रित करते. मिथिलाला ऑनबोर्ड करणे हे ज्‍युलिओच्‍या दीर्घकालीन विस्‍तारीकरण धोरण आणि ब्रँड-निर्मिती उपक्रमांशी संलग्‍न धोरणात्‍मक पाऊल आहे. या सहयोगाचा भाग म्‍हणून ती ब्रँडच्‍या आगामी मार्केटिंग उपक्रमांसह सोशल मीडिया मोहिमांमध्‍ये पाहायला मिळेल.

ज्‍युलिओचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी वरूण सूद म्‍हणाले, ''डेटिंग ॲपसंदर्भात आव्‍हाने, मानसिक आरोग्‍यावर होणारा परिणाम व घोटाळ्यांसह आज अविवाहितांना खरे प्रेम शोधण्‍याच्‍या त्‍यांच्‍या प्रवासामध्‍ये अवास्‍तविक आव्‍हानांचा सामना करावा लागतो.''

ते पुढे म्‍हणाले, ''मिथिला पालकर सारख्‍या मिलियन आयकॉनसोबत सहयोग करत आमचा जबाबदार व सुरक्षित डेटिंग/मॅचमेकिंगप्रती चळवळीला चालना देण्‍याचा मनसुबा आहे. तिची मूल्‍ये, प्रामाणिकपणा आणि जोडीदार शोधण्‍याप्रती दृष्टिकोनामधून ज्‍युलिओचे तत्त्व दिसून येते, ज्‍यामुळे तिच्‍यासोबत सहयोग करणे आमच्‍यासाठी स्‍वाभाविक होते. आम्‍हाला तिला ऑनबोर्ड करण्‍याचा आनंद होत आहे, आम्‍ही एकटेपणाचे निराकरण करण्‍यासाठी सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणण्‍याकरिता तिला शुभेच्‍छा देतो. आम्‍ही अविवाहितांना ज्‍युलिओ मेम्‍बरशिपसाठी अर्ज करण्‍याचे आणि खरे प्रेम शोधण्‍याच्‍या दिशेने अर्थपूर्ण पाऊल उचलण्‍याचे आवाहन करतो.''

मिथिला पालकर म्‍हणाली, ''मला ज्‍युलिओसोबत‍ सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. ज्‍युलिओने माझ्याशी संपर्क साधला, तेव्‍हा मॅचमेकिंगप्रती त्‍यांचा नवीन दृष्टिकोन पाहून मला खूप आनंद झाला. भावनिक आधार, साहचर्य आणि आपलेपणाची भावना देणाऱ्या वास्‍तविक जीवनातील अर्थपूर्ण नात्‍यांना चालना देण्‍याच्‍या त्‍यांच्‍या दृष्टिकोनाने माझे लक्ष वेधून घेतले. ज्‍युलिओ सुरक्षितपणे व जबाबदारीने मॅचमेकिंगला चालना देण्‍याच्‍या मिशनवर आहे आणि जगभरातील अविवाहितांना पुढाकार घेत या परिवर्तनात्‍मक चळवळीचा भाग होण्‍यास प्रेरित करत आहे.''

Post a Comment

Previous Post Next Post