अलिबाग (धनंजय कवठेकर) : अलिबाग तालुक्यातील किहीम मंडळ (तलाठी सजा) अंतर्गत किहीम आदिवासी वाडी येथे शुक्रवार दि.३० ऑगस्ट व बामणसुरे आदिवासी वाडी येथे शनिवार दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी असे दोन दिवस आदिम जमातीच्या विकासाकरिता प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत प्रधानमंत्री जनमन ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत कार्यक्रमामध्ये आदिवासी जमातीच्या बांधवांना घरकुल योजना, आधार कार्ड, आधार कार्ड अपडेट, जातीचा दाखला, रेशनकार्ड, जनधन खाते, आयुष्यमान भारत कार्ड, शिष्यवृत्ती, मातृत्व लाभ, आरोग्य तपासणी, किसान सन्मान निधी योजना अशा अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, मंडळ अधिकारी किहीम - श्रीनिवास मेतरी, किहीम - तलाठी ललिता सुदाम शिर्के, वैद्यकीय अधिकारी - श्रीकांत देशमुख व त्यांचे सर्व सहकारी, समुदाय आरोग्य अधिकारी - मापगांव स्वप्नील भुसाळ, एकात्मिक आदिवासी विकास विभाग पेण - क्रांती पाटील, प्रतिक पाटील, आरोग्य सेवक - मापगाव के. पी. घरत, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कोतवाल - प्रभाकर तळप, किहीम ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह किहीम आदिवासी वाडीवरील व बामणसुरे आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधव या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.