नवी दिल्ली : एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी रविवारी हवाई मुख्यालय (वायू भवन) येथे हवाई दलाचे उपप्रमुख (DCAS) म्हणून पदभार स्वीकारला. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक, नवी दिल्ली येथे जाऊन शूर शहीदांना आदरांजली वाहिली. एअर मार्शल तेजिंदर सिंग १३ जून १९८७ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत रुजू झाले. त्यांना लढाऊ विमान उडवण्याचा ४५०० तासांपेक्षा जास्त अनुभव आहे. ते भारतीय हवाई दलाचे 'अ' श्रेणीचे फ्लाइंग ट्रेनर देखील आहेत.
एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी यापूर्वी फायटर स्क्वॉड्रन लीडर, रडार स्टेशन आणि मोठ्या फायटर बेसचे नेतृत्व केले आहे. ते जम्मू-काश्मीरचे एअर कमांडिंग ऑफिसरही राहिले आहेत. त्यांच्या सेवेदरम्यान त्यांनी हवाई दलाच्या मुख्यालयात ऑपरेशनल स्टाफ, एअर हेडक्वार्टरमध्ये एअर कमोडोर (पर्सोनल ऑफिसर-१), एकात्मिक संरक्षण स्टाफचे उप सहायक प्रमुख, मुख्यालय आयडीएस येथे आर्थिक नियोजन, एअर कमांडर (एरोस्पेस सिक्युरिटी), एअर चीफ म्हणून काम केले आहे. हवाई मुख्यालयात असिस्टंट चीफ ऑफ आर्मी ऑपरेशन्स आणि ACAS ऑपरेशन्स (स्ट्रॅटेजी) यासारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
एअर मार्शल तेजिंदर सिंग यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवांसाठी त्यांना २००७ मध्ये वायुसेना पदक आणि २०२२ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. जेव्हा हवाई दलाला LCA Mark-१A आणि LCA Mark२ सह अनेक महत्त्वाचे विमान प्रकल्प पुढे नेणे आणि सुखोई-३०MKI फ्लीटचे अपग्रेडेशन करायचे आहे अशा क्षणी एअर मार्शल सिंग यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
.jpeg)