इंदापूर (श्रावणी कामत) : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद प्रमुख विश्वस्त या. एस. एम. देशमुख, राज्य अध्यक्ष शरद पाबळे, जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर यांच्या मार्गदर्शक आणि सूचनेप्रमाणे इंदापुर तालुका पत्रकार संघाची निवडणूक रविवारी घेण्यात आली.
सदर निवडणूक प्रक्रिया ही उपस्थित सर्व सदस्य यांच्या सहमतीने बिनविरोध पार पडली आहे. यावेळी निवडून आलेल्या कार्यकारिणीमध्ये राजकुमार थोरात ( अध्यक्ष), शहाजी राजे भोसले ( उपाध्यक्ष ), शत्रुघ्न ओमासे (उपाध्यक्ष), डाॅ. गजानन टिंगरे ( उपाध्यक्ष), तात्यासाहेब घाटे (सचिव), प्रदिप तरंगे (सह सचिव) , हरिदास वाघमोडे (खजिनदार), महेश गडदे ( सह खजिनदार), बाळासाहेब धावडे ( संघटक ), धनंजय थोरात (संघटक), संभाजी रनवरे ( सह संघटक), संतोष भरणे ( सह. संघटक), डॉ. विकास शहा (सल्लागार) यांची निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रविंद्र पाटील आणि सहाय्यक म्हणुन एम.जी. शेलार यांनी काम पाहिले. नव निर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार माजी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी केला. परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख. राज्य अध्यक्ष शरद, विभागीय सचिव मोकाशी पाबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर , जिल्हा महिला पत्रकार संघ अध्यक्षा श्रावणी कामत यांनी फोनद्वारे सर्वांचे अभिनंदन केले आहे.