अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी मिलींद आष्टीवकर यांची निवड
रायगड, (श्रावणी कामत) : आचार्य अत्रे सारख्या महाविभुतीने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद भुषवले असून हे पद भुषवणे मी माझे भाग्य समजतो. छत्रपती शिवरायांच्या पवित्र रायगडभुमीतून व देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या रोहा नगरीतून हे पद स्विकारत असताना रायगड जिल्ह्याचे व रोह्याचे नांव उंचावण्याचे काम आपण करणार आहोत. पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे काम देशात सुरू असून बारा हजार सदस्य असणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या समस्यांसाठी आणखी काम करायचे असल्याने यापुढील दोन वर्ष अधिक भारदस्त काम करणार असे परखड मत सत्काराला उत्तर देताना अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांनी व्यक्त केले. तर उपस्थितांचे प्रेम पाहून तुम्ही सर्वांनी केलेल्या सत्काराबद्दल ऋण त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी मिलींद आष्टीवकर यांची निवड झाल्याबद्दल रायगड प्रेस क्लब व रोहा प्रेस क्लब यांच्यातर्फे त्यांचा जाहीर सत्कार सोहळा रोह्यात जेष्ठ नागरीक सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमा ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे,कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे,ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी,माजी अध्यक्ष विजय मोकल, भारत रांजणकर,मोहन जाधव,खजिनदार, दर्वेश पालकर,संघटक भारत गोरेगावकर,सचिव अनिल मोरे,भाई ओव्हाळ,राजन वेलकर,सिटिझन फोरम ट्रस्ट चे अध्यक्ष नितीन परब,तसेच मिलींद अष्टिवकर यांच्या पत्नी समिधा अष्टिवकर त्यांच्या मातोश्री मंगलाताई सीताराम अष्टिवकर यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातून पहिला सत्कार मिलींद अष्टिवकर यांचा होणे गरजेचे असल्याने त्यांचा सत्कार रायगड प्रेस क्लबतर्फे करण्यात आला असे सांगत संघटन कौशल्य असणारे मिलिंद अष्टीवकर हे मराठी पत्रकार परिषदेची धुरा समर्थपणे पेलतील असा विश्वास रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी व्यक्त केला तर यापुढे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत राहणार आहोत असा खांबे यांनी शब्द दिला.
कार्यक्रमात रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी,रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे,माजी अध्यक्ष भारत रांजणकर,प्रमुख संघटक भारत गोरेगावकर,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक विजय मोकल,कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख,पोलादपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष प्रकाश कदम,रायगड टाइम्सचे संपादक राजन वेलकर,रोहा येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके,अरुण करंबे,रवींद्र ओव्हाळ,मुरुड पत्राकार संघाचे माजी अध्यक्ष मेघराज जाधव, मुरूड येथील प्रसिद्ध छायाचित्रकार सुधीर नाझरे,रोहा सिटीजन फोरमचे अध्यक्ष नितीन परब,सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख, मुरूड पत्रकार संघाचे संजय कराडे, रोहातील सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर रोहातील प्रसिद्ध गिर्यारोहक सुखद राणे,धाटावचे सूर्यकांत मोरे, रोहातील युवक चळवळीचे अमित कासार,समिधा अष्टीवकर यांनी मिलिंद अष्टिवकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र जाधव सूत्रसंचालन ॲड.महेश पवार तर उपस्थितांचे शशिकांत मोरे यांनी आभार व्यक्त केले.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड प्रेस क्लब आणि रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकारी वर्गाने विशेष मेहनत घेतली होती.