डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवाई बालक मंदिर ,पूर्व प्राथमिक विभागात सोमवारी बैलपोळा साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना विविध सणांची माहिती देण्यात आली.भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे बैलपोळ्याला एक विशेष आपल्याकडे महत्त्व आहे.
शाळेमध्ये बाल शिशु वर्गाच्या मुलांनी बैलांची पूजा केली. शेतीमध्ये बैलाचा उपयोग, आपण जे अन्न खातो, ते शेतकरी कसे पिकवतो याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. ग्रामीण भागामध्ये हा सण कसा साजरा केला जातो याचीही माहिती देण्यात आली.