डोंबिवलीत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) : स्टेशन बाहेरील १०० मीटरच्या आतील परिसरात बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. कारवाईत सातत्य असल्याचे पाहून डोंबिवलकरांनी पालिका प्रशासनाचे कौतुक केले आहे. 




पालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या आदेशानुसार डोंबिवलीतील 'फ' प्रभाग सहायक आयुक्त भरत पवार, फेरीवाला अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख व कर्मचारी क्षेत्र हद्दीतील फडके रोड, नेहरू रोड, चिमणी गल्ली, स्टेशन बाहेरील परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करत  समान जप्त करण्यात आले.कारवाई सुरु होताच फेरीवाल्यांनी आपले बस्तान हलवत सामान घेऊन निघून जाण्याचा  प्रयत्न केला.





Post a Comment

Previous Post Next Post