Diva new post office : दिव्यात स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू

 



दिवेकरांना भारतीय डाकचा दिलासा


दिवा, (आरती मुळीक परब) : दिव्यातील नागरिकांची डोंबिवली, मुंब्रा, ठाणे पर्यंत होणारी पायपीट आता थांबणार आहे. सोमवारी दिव्यात स्वतंत्र्य पोस्ट ऑफिसचे उद्घाटन मुंब्रा देवी कॉलनी परिसरात झाले. भारतीय डाकने दिवेकरांना दिलासा दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



सोमवारी सकाळी ठाणे पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधीक्षक समीर महाजन (IPoS),  एस. बी. व्यवहारे, डेप्युटी  सुप्रिडेंट पद्मजा कामत, असिस्टन्ट सुप्रिडेंट अमिता सिंग, विकास पाटील विकास अधिकारी आणि आता तरी जागा हो दिवेकर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय भोईर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वतंत्र दिवा पोस्ट ऑफिसचे उदघाटन दिमाखात करण्यात आले. त्यावेळी महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पोस्टात खाती उघडण्यासाठी तसेच पोस्ट ऑफिस द्वारा राबविणाऱ्या इतर सोयी सुविधांच्या लाभाकरिता खुपच गर्दी केली होती.




मुंब्रा पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत दिवा येथे मोजक्या सेवा देणारे ब्रांच पोस्ट ऑफिस काही वर्षे सुरु होते. परंतु  पोस्टाशी निगडित काही मोजक्या प्रमुख कामांसाठी लोकांना डोंबिवली, मुंब्रा, ठाणे येथे जावे लागत असे, त्यात नागरिकांचा वेळ जाऊन खुप पायपीट ही होत होती. सध्या दिव्याची लोकसंख्या ८ ते १० लाखाच्या घरात असताना दिवा ब्रांच पोस्ट ऑफिसवर प्रचंड ताण येत होता. नागरिकांना स्वतः पोस्ट ऑफिसमध्ये येऊन पत्रे, पार्सल घ्यावी लागत होती. अशी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता दिव्यातील समाजसेवक विजय भोईर यांच्या अनेक महिन्यांपासूनच्या पाठपुराव्यामुळे अखेर दिव्यात स्वतंत्र पोस्ट ऑफिसच्या मागणीला पूर्णविराम मिळाला. पोस्ट विभागाने दिव्यासाठी स्वतंत्र पूर्ण वेळ पोस्ट ऑफिस सुरु केल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


त्या मध्ये पोस्टाच्या आणि सरकारी विविध सेवा देण्यात येतील. तसेच नियमित आधार कार्डशी निगडित सर्व सेवा सुरु राहतील. याचा लाभ दिव्यातील सामान्य नागरिकांना घेता येईल, असे ठाणे पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधीक्षक समीर महाजन यांनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान सांगितले. या नविन उप डाकघरमध्ये आधार कार्ड काढणे वा त्यात बदल करण, पार्सल पोस्ट, पत्रे, मुलींसाठी सुकन्या योजना, वरिष्ठ नागरिकांसाठी बचतीच्या योजना, सर्व नागरिकांसाठी असणाऱ्या बचतीच्या योजना, महिला सन्मान बचत पत्र योजना, पीपीएफ खाते काढणे, पोस्टल लाइफ इंशोरंस स्कीम इ. आणि इतर भारतीय डाकच्या वेगवेगळ्या सोयी सुविधांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.





Post a Comment

Previous Post Next Post